News Flash

बेकायदा इमारतीवर हातोडा

पालिकेच्या सेवेतील ६० पोलिसांच्या साहाय्याने कारवाई

खाडीपात्रात बेकायदा इमारतीची एक बाजू तोडण्यात आली.

पालिकेच्या सेवेतील ६० पोलिसांच्या साहाय्याने कारवाई

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील खाडीकिनारी बांधलेली चार मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी सायंकाळीच पालिकेने कारवाई केली.  या इमारतीच्या चारही बाजू तोडण्यात आल्या.

विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता पालिका सेवेतील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते.  त्यानुसार अतिक्रमण नियंत्रक प्रमुख सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ह’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे, परशुराम कुमावत, भारत पवार यांच्या उपस्थितीत ४० ते ५० कामगार, जेसीबी, पोकलेन यांच्या साहाय्याने बुधवारी संध्याकाळी प्रतीक म्हात्रे याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई केली. बेकायदा बांधकामाची राजूनगर भागातील एका जागरूक नागरिकाने मुख्यमंत्री, नगरविकास प्रधान सचिव, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू होते. मात्र पालिका प्रशासनाने त्याला दाद दिली नाही. बेकायदा बांधकामांवर पालिकेकडून धडाधड हातोडे पडू लागल्यामुळे आता भूमाफियांमध्ये, या बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या काही पालिका कामगारांचे धाबे दणाणले आहेत. ‘लोकसत्ता’मध्ये ११ ऑक्टोबर रोजी या बेकायदा इमारतीचे वृत्त छायाचित्रासह प्रसिध्द झाले होते.

केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर टिटवाळा, गंधारे, रेतीबंदर, मोठागाव ते कोपर खाडीपर्यंतच्या पट्टय़ात खाडी किनारी भागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही. याची काळजी घेण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशी बेकायदा बांधकामे उभी राहिली तर ती जमीनदोस्त केली जातीलच, पण ती बांधकामे का उभी राहिली याचा जाब प्रभाग अधिकाऱ्यांना विचारून त्यांच्यावरही यापुढे कारवाई प्रस्तावित करण्याचे निश्चित केले आहे.    -सुनील जोशी, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण नियंत्रण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 3:14 am

Web Title: illegal buildings at thane
Next Stories
1 बांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर
2 जव्हारचा ‘दरबारी दसरा’ उत्साहात साजरा
3 पालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक
Just Now!
X