संपूर्ण साजशृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहऱ्याला रूप येत नाही असा दागिना म्हणजे नाकातली चमकी अथवा नथ हे आभूषण. फक्त सणासुदीला नाही तर दरदिवशी तयार होताना महिला स्वत:ची एक वेगळी स्टाइल तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपलीच स्वतंत्र शैली निर्माण करून काही वेगळे करण्याच्या या फॅशनमध्ये नाकातली चमकी व नथनीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

बॉलीवूड तारका आणि त्यांनी निर्माण केलेली फॅशनची बाजारात चलती आहे. जुन्याच फॅशनला थोडेसे आधुनिक तडका देऊन ही फॅशन पुन्हा बाजारात येऊ पाहात आहे. मधल्या काळात नाक टोचणे हे ‘गावराण’ समजले जायचे. नाकात चमकी घालणे हे गावंढळपणाचे लक्षण असल्याचा समज रूढ होत असतानाच बॉलीवूड व मराठी तारकांनी नाकातील आभूषणांना महत्त्व दिल्याने पुन्हा एकदा ही ‘गावराण’ फॅशनच महाविद्यालयीन तरुणींच्या नटण्या-मुरडण्याचा दागिना झाला आहे.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात

हिंदी चित्रपटातील एखादं गाणं असो वा मराठी मालिका सध्या नथ ही एक महत्त्वाचा दागिना झाला आहे. नवा साज घेऊन आलेल्या मराठी दागिन्यात नथीचा मान मोठा आहे. गोगो गोविंदा म्हणत दहिहंडी फोडणारी सोनाक्षी सिन्हा, मला जाऊ दे असे मोठय़ा ठसक्यात म्हणणारी विद्या बालन या सगळ्यांमध्ये समान असणारी गोष्ट म्हणजे त्यांनी आवर्जून मिरवलेली मराठमोळी नथ. महाविद्यालयीन मुलींपासून ते अभिनेत्रीपर्यंत मराठमोळी नथ आता स्टाइल स्टेटमेंट झाली आहे. मध्यंतरी काहीशी कालबाह्य़ झालेली नथ किंवा चमकीसाठी नाक टोचून घेणे आताच्या तरुणांसाठी काहीसे ‘प्रायोगिक’ झाले आहे.

नासिकाभूषण है सौभाग्यलंकार मानले गेल्याने प्रत्येक प्रांतात आणि परंपरामध्ये तिला वेगळे स्थान आहे. महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत व काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताचे सांस्कृतिक वैविध्य अतुलनीय आहे. प्रत्येक प्रदेशाची संस्कृती वेगळी, परंपरा वेगळ्या. प्रत्येक प्रांताच्या दागिन्यांची घडनावळ वेगळी, त्याचे महत्त्व वेगळे, त्यांचा हेतू वेगळा. पण भारतभर विखुरलेल्या विविध राज्यांमधील ही दागिन्यांची आवड आणि महत्त्व त्यांना कायम जिवंत ठेवणार यात शंका नाही.

कारवारी नथ

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात राहणाऱ्यांमध्ये अशा पद्घतीची नथ प्रचलित असलेली पहावयास मिळते. मोती आणि सोन्याचा योग्य वापर या नथीमध्ये केल्याने तुमचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. नाकाच्या मध्यमागी असलेल्या मांसल भागाला टोचून ही नथ परिधान केली जाते. जय मल्हार मालिकेतील बानू या व्यक्तिरेखेमुळे लग्नसमारंभात किंवा सण-उत्सवांच्या काळात नऊवारी साडी परिधान केल्यावर ही नथ परिधान करण्यास मुली पसंती देत आहेत. नाक टोचलेले नसले तरी यामध्येही दाबाची नथ दुकानात उपलब्ध आहे.

लवंग चमकी

नाक टोचलेले आहे, परंतु चमकी घालायची हौस तुम्हाला नाही. नाकाचे होल बुजू नयेत म्हणून त्यात काडी घालून ठेवली जाते. या काडीमध्येही आता विविध प्रकार उपलब्ध आहेत. या चमकीला लवंग चमकी म्हणून ओळखले जाते. यात केवळ काडी असून तीच्या एका बाजूला लहानसा खडा किंवा लहानसा बिंदू तुम्हाला दिसेल. सोन्या, चांदीच्या दागिन्यांत हा प्रकार दिसतो.

गोल सुंकल्यासारखी नथ

हिमाचल प्रदेशातील एका जमातीत या नथीचं खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रीच्या नाकात गोल सुंकल्यासारखी पण बांगडीच्या आकाराची नथ असते. बायकोच्या नाकातल्या नथीच्या आकारावर तिथल्या पुरुषाचा सामाजिक दर्जा ठरत असतो. नथ जेवढी मोठी तेवढा तो पुरुष श्रीमंत वा उच्च दर्जाचा. या नथी रोजच्या वापरात वापरल्या जात नसल्यातरी लग्न समारंभात नववधू लेहंगा, शरारा परिधान केला तर त्यावर हमखास परिधान करतात.

नथ

नथ हा पेशवाई संस्कृतीने अजरामर केलेला महाराष्ट्रीय दागिना. नथीमध्ये पूर्वीपासूनच्या पारंपरिक नक्षी रूढ आहेत. यात मराठा पद्धतीची नथ थोडी मोठी असते, तर ब्राह्मणी पद्धतीची नथ नाजूक असते. याशिवाय नक्षीदार विणकाम केल्यासारखी सरजाची नथही मिळते. पेशवेकालीन नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरूप होते. पुढे पेशवेकाळात महाराष्ट्राचे वैभव वाढल्यानंतर तालेवार लोकांनी त्यात पाणेदार टपोरे मोती जडविले. यात सात किंवा त्यापेक्षा अधिक मोत्यांचा समावेश आपल्याला आढळतो. मधोमध लाल किंवा हिरवी रत्ने बसविलेली असेच नथीचे स्वरूप आहे. आकाराने मोठी नथ किंवा तिच्यातले हिरे, मोती श्रीमंतीची खूण असायचे. काळानुसार तिचा आकार बराच कमी झाला आहे. नाकापुरतीच, लहान आकाराची नथ आता मुली जास्त पसंत करतात. यात अमेरिकन खडे, केवळ मोत्यांची किंवा मोठय़ा खडय़ांची नथ बाजारात उपलब्ध आहे. काही मुलींना नाक टोचण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी सोयीस्कर अशी दाबाची नथही बाजारात उपलब्ध आहे.

नासिकाभूषण एक महत्त्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांमध्ये तो सौभाग्यलंकार म्हणूनच रूढ झाला आहे. आपल्या सवाष्णीचे लेणे म्हणून मान्यता पावलेली नथ, तिच्या आगळ्या नजाकतीसाठी अजूनही प्रसिद्ध आहे. तर नथेबरोबरच रोजच्या वापरासाठी महिला चमकीचा वापर करू लागल्या आहेत.

चमकी

नाकात चमकी घालणे ही फॅशन पुन्हा खऱ्या अर्थाने रूढ होत आहे. विविध प्रकारांत व आकारांत या चमक्या दुकानात तुम्हाला उपलब्ध होतात. अगदी दोनशे रुपयांपासून ते आठ ते दहा हजारांपर्यंत मोत्याच्या, खडय़ाच्या, अमेरिकन खडय़ांच्या चमक्या दुकानात उपलब्ध आहेत. पाच रंगीत खडे, मीना वर्क, नक्षीकाम केलेल्या असे प्रकार त्याशिवाय मोर, फूल, कुयरी, शंकरपाळी, पानं आणि विविध भौमितिक आकारांमध्येही चमकी उपलब्ध आहेत.