पुणे आणि ठाण्यापाठोपाठ आता कल्याण आणि डोंबिवलीतही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. डोंबिवलीत करोनाचा प्रादु्र्भाव कमी व्हावा यासाठी २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. आता लॉकडाउन आणखी सात दिवस वाढवण्यात आला आहे. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापने बंद राहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

२ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सुरु होती. मेडिकलची सुरु राहण्याची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान आता हा लॉकडाउन आणखी सात दिवसांनी म्हणजेच १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीत करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी २ ते १२ जुलै या कालावधीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. अशात आता करोना रुग्णांची संख्या कमी न झाल्याने आणि प्रसार वाढत असल्याने हा लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

नागरिकाना काय करण्यात आलं आवाहन?

गरज असेल तरच बाहेर पडा

बाहेर पडायचं असेल तर मास्क आवर्जून वापरा

बाहेरुन घरात आल्यानंतर हँड सॅनेटायझर वापरा

हात आणि पाय स्वच्छ धुवा

जेवणात लसूण, आलं, हळद यांचा वापर वाढवा

यांसारख्या सूचना महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. तसंच लोकांनी बाहेर पडताना मास्क लावावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे सोशल डिस्टन्सिंग पाळावे असंही आवाहन करण्यात आलं आहे.