ठाण्यात १२ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १२ जुलैच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात जे हॉटस्पॉट आहेत तिथे अत्यंत प्रभावीपणे लॉकडाउनची अमलबजावणी केली जाणार आहे असेही ठाणे महापालिकेने जाहीर केलं आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने काय आदेश दिले आहेत?
अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण कारणाशिवाय इतर सर्व कारणांसाठी महानगरपालिका हद्दीत लॉकडाउन लागू
इंटरसिटी, एमएसआरटीसी, बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना संमती दिली जाणार नाही. टॅक्सी, ऑटोरिक्षा यांनाही परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी/ देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डर अंतर्गत ड्रायव्हर शिवाय फक्त एका प्रवाशासह खासगी वाहनांना, परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा आणि या आदेशात असलेल्या मान्य कृतींसाठी परवानगी असेल.
सगळ्या आंतरराज्यीय बस, प्रवासी वाहतूक, खासगी वाहने, खासगी ऑपरेटर्सकडून कामकाज बंद असेल, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
ज्या व्यक्तीला घरात ठेवणं आवश्यक आहे त्यांनी त्याचे सक्त पालन केलं पाहिजे नाहीतर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल
सगळे रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोर पालन करतील
सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास संमती नाही
व्यावसायिक अस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा गोदाम इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचं कामकाज बंद ठेवतील. सतत प्रक्रिया आणि मेडिकल्स, त्यांचे आवश्यक असलेले उत्पादन आणि उत्पादक युनिट्सना संमती. डाळ, तांदूळ, गिरणी, खाद्य व संबंधि उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांमध्ये गुंतलेल्या युनिट्सना संमती
सरकारी कार्यालयं कमीत कमी कर्मचाऱ्यांसह ऑपरेट करण्याची संमती देण्यात आली आहे. चेक काऊंटरजवळ, एकमेकांपासून ३ फूट अंतर ठेवणं आवश्यक आहे योग्य स्वच्छता आणि हात सॅनेटायझर्सने स्वच्छ करणे, धुणे बंधनकारक आहे.
असे सगळे नियम लागू करत ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. २ जुलै रोजी सकाळी ७ ते १२ जुलै सकाळी ७ असा लॉकडाउनचा कालावधी असणार आहे.