‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधील दुकानांमध्ये उपस्थिती

ठाणे : पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ मोठय़ा उत्साहात सुरू असून या महोत्सवाला आज, गुरुवारी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतही उपस्थिती लावणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या नौपाडय़ातील कडली, कलामंदिर आणि राम मारुती मार्गावरील शुभकन्या या दुकानांना शर्मिष्ठा राऊत भेट देणार असून येथे उपस्थित ग्राहकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबईतील ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ माध्यमातून उपलब्ध होते. दरवर्षी हा महोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडतो आणि महोत्सवाला नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतो. यंदाही अशाच प्रकारे मोठय़ा उत्साहात हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाच्या निमित्ताने विविध सिनेकलाकांराना भेटण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. आज, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील संयोगिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहे.

या महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांना त्या भेटी देणार आहेत. त्या वेळेस त्यांना भेटण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. या भाग्यवान विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर, रेफ्रिजरेटर या वस्तूंसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज् अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा  रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स  हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत, तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डीजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरन्ट हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत, तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

  •   पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी  झालेल्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  •  सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  •  ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.
  • ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान  विजेत्यांची  निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि   ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.
  •  या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांसाठी संपर्क

  • कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१, ’ गोविंद भोसले- ९८१९८१४२५३
  • गौरव याज्ञिक- ७५०६५२९०२०
  •  हर्षद गोफणे- ९७६९१३३३४३
  •  प्रदीप पंजाबी- ९८२१५३४६७७ (नवी मुंबई)