News Flash

महापालिकांच्या क्षेत्रवाढीचा एमएमआरडीएचा प्रस्ताव

अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी एकत्रित महापालिका?

अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी एकत्रित महापालिका?

जयेश सामंत, सागर नरेकर लोकसत्ता

ठाणे : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील बहुतांश भागांसाठी विकास प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएने आपल्या प्रादेशिक आराखडय़ात या क्षेत्रातील काही महापालिकांचे क्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये वसई-विरार, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या महापालिकांचा समावेश आहे. त्यासोबतच वेगाने विकसित होत असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांची एकत्रित महापालिका करण्याचेही आराखडय़ात प्रस्तावित करण्यात आले आहे.

मुंबई महानगर प्रदेशासाठी एमएमआरडीएने २०१६ साली तयार केलेल्या प्रादेशिक आराखडय़ाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मंजुरी दिली. या आराखडय़ात एमएमआरडीएने मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका, महापालिका विस्तारीकरणाचा, नव्या महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यात मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांची एकत्रित महापालिका करण्यावर विशेष लक्ष असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांच्या क्षेत्राचा विस्तार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नेरळ ममदापूर, रीस मोहपाडा आणि पोयनाड अम्बेपूर या नवीन पालिका स्थापित करण्याची गरज असल्याचे एमएमआरडीएने आराखडय़ात स्पष्ट केले आहे. तसेच कर्जत, पेण आणि अलिबाग नगर परिषदांची हद्द वाढ करणे आवश्यक असल्याचेही एमएमआरडीएने नमूद केले आहे.

एमएमआरडीएने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी संयुक्त पालिका आणि पनवेल महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव २०१६ साली मांडला होता. त्यापैकी पनवेल महापालिकेची वेगाने स्थापना करण्यात आली. पनवेल परिसरात भाजपची ताकद असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी विशेष लक्ष दिले. याउलट शिवसेनेचे एकहाती वर्चस्व असलेल्या अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिकांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा टाळण्यात आला. बदलापुरातील बहुतांश लोकप्रतिनिधीचा एकत्रित महापालिकेला विरोध आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका एकत्र करून त्यात अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील ७ गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

तो प्रस्ताव फक्त शहरांच्या भविष्यातील विकासासाठी मांडण्यात आला आहे. त्यांनी नियोजनाचा भाग म्हणून हे काम केले आहे. एकत्रित महापालिका होण्याचा प्रश्न नाही. बदलापुरातील नागरिकांना जे हवे असेल तशी मागणी भविष्यात केली जाईल.  – किसन कथोरे,आमदार, मुरबाड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:35 am

Web Title: mmrda proposal for expansion of municipal area zws 70
Next Stories
1 ठाण्यातील मुंडा डोंगर हिरवाईने बहरला
2 पालिकेचा आर्थिक गाडा चिखलात
3 टेम्पोत जन्मलेल्या बाळाचा उपचाराअभावी मृत्यू
Just Now!
X