कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोगवटा प्रमाणपत्राची प्रतीक्षा

ठाण्यापलीकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे मुंबई विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे उपकेंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेच्या भोगवटा प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत आकारण्यात आलेल्या कराच्या एकत्रित रकमेचा भरणा विद्यापीठाने नुकताच केला असून, त्यामुळे उपकेंद्राच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रमाणपत्र मिळताच याठिकाणी दूर आणि मुक्त अध्यायन संस्था सुरू करण्याचे बेत विद्यापीठ स्तरावर आखले जात आहेत.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

मुंबईपासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठापर्यंत पायपीट करावी लागू नये याकरिता विद्यापीठाने कल्याण आणि ठाणे अशा दोन ठिकाणी उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन २०१० साली करण्यात आले होते. कल्याण उपकेंद्रासाठी विद्यापीठाला महापालिकेमार्फत २५ हजार ३७० चौरस मीटर क्षेत्रफळाची विस्तीर्ण जागा देण्यात आली. त्यावर उपकेंद्राची इमारतही उभारण्यात आली. मात्र मुंबई विद्यापीठाकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या कराची रक्कम महापालिकेकडे जमा केली जात नसल्याने यासंबंधीची पुढील प्रक्रिया थंडावली होती. विद्यापीठामध्ये मूल्यांकनावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे कल्याण उपकेंद्राची प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याची चर्चा विद्यार्थी तसेच प्रशासकीय वर्तुळात सुरू होती.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाकडून ७ नोव्हेंबर २०१७ रोजी महापालिकेस ३ कोटी ५७ लाख ९ हजार ७६७ रुपयांचा कर भरणा करण्यात आल्याने उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक असलेले पथकर, पाणीपट्टी, वृक्षकर अशा स्वरूपाचे विविध सात प्रकारचे कर महापालिकेने विद्यापीठास आकारले होते. दरम्यान, आवश्यक रकमेचा भरणा करण्यात आल्याने उपकेंद्र सुरू  होण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया महापालिकेमार्फत लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.

नवीन शैक्षणिक वर्षांत सुरुवात?

महानगरपालिकेचे प्रमाणपत्र मिळताच विद्यापीठाची दूर व मूक्त अध्ययन संस्था तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली. कल्याण उपकेंद्रामध्ये संगणक अभियांत्रिकी (एम.टेक इन कम्पुटर इंजिनीअरिंग)  या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे. २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठराव मान्य झाल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोडे यांनी दिली.

विद्यापीठाने भरलेले कर

  • पथकर
  • कन्झव्‍‌र्हन्सी
  • पाणीपट्टी
  • कन्झव्‍‌र्हन्सी बेनिफिट
  • कल्याण महानगरपालिका-ईडीएन कर
  • वृक्षकर
  • राज्य सरकार शिक्षण कर

महापालिकेकडून सर्व कागदपत्र मुंबई विद्यापीठाला देण्यात आली होती. विद्यापीठाकडून रक्कम येणे बाकी असल्याने आम्ही पुढची पाऊले उचलू शकत नव्हतो. परंतु आता मुंबई विद्यापीठाकडून रक्कम जमा करण्यात आली आहे. महापालिका लवकरात लवकर हे उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रसत्नशील आहे.

राजेंद्र देवळेकर, महापौर, कडोंमपा