ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना सोमवारी ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करताना पोलिसांनी नगरसेवक हनमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण या चौघांना काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. या चौघांविरोधात पोलिसांनी न्यायालयामध्ये सुमारे ३०४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. याशिवाय, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांनी विशेष चौकशी पथक (एसआयटी) तयार करण्याचाही निर्णय घेतला होता. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाबद्दल विधानसभेत भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बसत असेल तर आरोपींविरूद्ध मोक्काही लावला जाईल, असे सांगितले होते.
सूरज परमार यांचे आत्महत्येआधीचे पत्र.. 
आव्हाड-मुल्ला भाऊ भाऊ! 
ठाण्यात राष्ट्रवादीत फूट ? सूरज परमार प्रकरणामुळे नगरसेवकांची गुप्त बैठक 
ठाणे कारागृहात मुल्लाभेटीस आव्हाडांना अटकाव