27 February 2021

News Flash

कल्याण डोंबिवलीत भाजी, किराणा दुकाने पाच नंतर बंद

खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला निर्णय

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण-डोंबिवलीत भाजी आणि किराणा दुकाने पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ७ एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साथ रोग प्रतिबंधक कायदा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार संध्याकाळी पाचनंतर मेडिकल स्टोअर्स आणि क्लिनिक वगळता जीवनावश्यक वस्तू, बेकरी, दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाला इ. खाद्यपदार्थ बंद ठेवण्यात यावीत असं स्पष्ट केलं आहे.

मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये आणि क्लिनिक वगळता इतर संबंधित व्यावसायिक आस्थापना व दुकाने यांचे मालक व संबंधितांनी या आदेशाचे उल्लंघन केले तर दंडात्मक कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 6:56 pm

Web Title: no vegetable and grocery shops will be open in kalyan and dombivali area from tomorrow scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: वसई-विरार शहरात करोनाबाधितांची संख्या पोहोचली १७वर; दोघांचा मृत्यू
2 मिरा भाईंदरमध्ये करोना बाधितांची संख्या ८
3 पालघरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कोरोनाबधित मृताच्या संपर्कात आलेल्या २९ जणांचे नमुने निगेटिव्ह
Just Now!
X