23 February 2020

News Flash

कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी पाणी नाही

कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (ता.१८) सकाळी आठ ते रात्रो आठ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (ता.१८) सकाळी आठ ते रात्रो आठ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोहिली, बारावे, नेतिवली जलशुद्धिकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पाणीपुरवठा केला जातो. बंदच्या काळात या चारही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागातील रहिवाशांनी अगोदरच पाण्याचा साठा करुन ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

First Published on February 15, 2020 12:10 am

Web Title: no water dombivali kalyan akp 94
Next Stories
1 बोडकेंच्या बदलीमागे शिंदेंची नाराजी?
2 कर्जाच्या बदल्यात कोटय़वधीची फसवणूक करणारी टोळी अटकेत
3 सुरक्षित प्रभागासाठी शोधाशोध
Just Now!
X