News Flash

उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्याचा २० जणांना चावा

भटक्या कुत्र्याने २० जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये १६ लहान मुले व चार स्त्रियांचा समावेश आहे.

जखमींवर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक तीनमध्ये मंगळवारी दुपारी तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले रस्त्यावर खेळत असताना, अचानक पिसाळलेल्या एका भटक्याने कुत्र्याने या खेळकरी मुलांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या मुलांना कुत्र्यापासून वाचविण्यासाठी काही पादचारी, स्थानिक रहिवासी पुढे सरसावले, त्यांनाही या पिसाळलेल्या कुत्र्याने लक्ष्य केले. या भटक्या कुत्र्याने २० जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये १६ लहान मुले व चार स्त्रियांचा समावेश आहे.

सर्व जखमींवर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कॅम्प क्र. ३ मधील सी ब्लॉक रस्त्यावर मंगळवारी दुपारी तीन ते पाच वयोगटांतील १५ ते १६ मुले रस्त्यावर गटागटाने खेळत होती. अचानक या भागात एक पिसाळलेला भटका कुत्रा आला. त्याने खेळत असलेल्या मुलांना चावे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे बेसावध असलेली मुले सैरावैरा पळू लागली. तरी या मुलांचा पाठलाग करून कुत्रा त्यांना चावू लागला. १६ मुलांच्या हात, पायांना या कुत्र्याने चावे घेतले. मुलांचा वाचविण्यासाठी परिसरातील चार स्त्रिया पुढे आल्या. त्यांनाही कुत्र्याने लक्ष्य केले. अठरा जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. एक मूल व स्त्रीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयातील सूत्राने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 4:26 am

Web Title: nomadic dog bit twenty student in ulhasnagar
टॅग : Ulhasnagar
Next Stories
1 कर्णावती एक्स्प्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू
2 लुईसवाडीमध्ये आगीत कार भस्मसात
3 मीरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईवर विहिरींचा उतारा
Just Now!
X