News Flash

पत्रीपूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला

कल्याणमधील रविवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले असून या पुलाचे उद्घाटन २५ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. २५ जानेवारीपासून पत्रीपुलावरील वाहतूक सुरू होणार आहे. हा पूल सुरू झाल्यास कल्याण शिळफाटा मार्गावर तसेच कल्याण शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कल्याणकर पत्रीपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून त्रस्त होते. या प्रकल्पासाठी आतापर्यंत ३४ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याण शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये तो पाडण्यात आला. त्यानंतर तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिले होते. त्यानंतर अनेक कारणांमुळे काम रेंगाळले. या कालावधीत एकाच पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने पत्रीपूल वाहतूक कोंडीचे केंद्र झाले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी केली.

पत्रीपूल प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ३४ कोटी रुपये खर्च आला आहे. पूल सुरू होणार असल्याने कल्याणमधील वालधुनी, सुभाष चौक, गजानन चौक, रामबाग, कल्याण रेल्वे स्थानक, कोळसेवाडी, नेतीवली, ९० फूट रस्ता या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:24 am

Web Title: patripul is open for traffic from monday abn 97
Next Stories
1 जुन्या-नव्या घोषणांची सरमिसळ
2 ठाण्यात पाणी देयकांमध्ये सावळागोंधळ
3 वसई-विरार मध्ये विवा होम्सच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी
Just Now!
X