शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आगरी समाजातील बांधवांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. करोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे होतो आहे. तेव्हा या रोगाला घाबरु नका असं दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे. या रोगाला घाबरलो तर या रोगापुढे आपण हरलो असं होईल. माझा अनुभव असा आहे की ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणातली तरुण मुलांचे बळी गेले आहेत. त्यांच्यासाठीच मी हा व्हिडीओ तयार करतो आहे. लोकांमध्ये भीती आहे.. ही भीती बाळगू नका. फक्त ठाणे जिल्ह्यातच हा रोग नाही तर संपूर्ण जगात हा रोग पसरला आहे. जोपर्यंत करोनाचं संकट टळत नाहीत तोपर्यंत आपण काळजी घेतली पाहिजे अशी मी विनंती सगळ्यांना करतो आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की जर करोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करुन घ्या, काळजी घ्या असंही दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे. तसंच तरुण मुलांना ही विनंती आहे की आपल्या गावात, समाजात या रोगाविषयी जनजागृती करा असंही आवाहन मी करतो असंही म्हात्रे यांनी म्हटलं आहे.