मागणीप्रमाणे मूर्ती तयार न होण्याची भीती

भाईंदर : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टाळेबंदीचा कालावधी  वाढवण्यात आला आहे. परंतु त्यामुळे या वर्षी गणेशोत्सवात गणेशमूर्तीची कमतरता भासणार असल्याची भीती मूर्तिकार व्यक्त करीत आहेत.

गणेशमूर्ती तयार करण्याकरिता हे मूर्तिकार मार्च महिन्यापासूनच तयारीला लागत असतात. परंतु यंदा सर्वच बंद असल्यामुळे मूर्ती तयार करणे एक आव्हानच असल्याचे मूर्तिकार सांगतात. यंदा गणेश उत्सवाला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना मूर्ती तयार करण्याचे काम बंद आहे. यावर योग्य तोडगा न निघाल्यास ऐन गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांच्या आवश्यकतेनुसार भिन्न भिन्न पद्धतीच्या मूर्तीदेखील उपलब्ध करणे अवघड होणार आहे. शिवाय या मूर्ती व्यवसायात रोजगार मिळवणाऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची चिंता मूर्तिकारांमध्ये निर्माण झाली आहे.

यावर योग्य तोडगा न  निघाल्यास मुर्त्यांंचा तुटवडा भासू शकण्याची भीती निर्माण झाली आहे.तसेच   नागरिकांच्या आवश्यकते नुसार भिन्न भिन्न पद्धतीच्या मुर्त्यां देखील  उपलब्ध करणे अवघड होणार आहे. शिवाय या मूर्ती व्यवसायात रोजगार मिळवणारम्य़ांचे प्रचंड नुकसान होण्याची चिंता मूर्तिकारांनमध्ये निर्माण झाली आहे.

गणेशमूर्तीची स्थापना आम्ही मोठय़ा श्रद्धेने करतो; परंतु यंदा करोनाचे संकट आल्यामुळे मनात मोठी काळजी निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थापना करावी की करू नये, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

निर्मला गवस, सामान्य नागरिक 

नागरिकांच्या मागणीप्रमाणे मूर्ती तयार करण्यास मोठा कालावधी लागतो. परंतु अद्यापही आमच्या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे मूर्ती तयार करण्याचे पुढे आव्हानच निर्माण होणार आहे.

किशोर नारकर, मूर्तिकार