ठाणे महापालिकेच्या विद्यमाने ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ‘ठाणे कला-क्रीडा महोत्सव २०१६’ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, साकेत पोलीस मैदान, घंटाळी मैदान, ढोकाळी येथील शरदचंद्र पवार क्रीडा संकुल, रहेजा गार्डन तरणतलाव, सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल, आर्य क्रीडा मंडळाचे मैदान या मैदानांवर पार पडल्या. राज्यस्तरीय असलेल्या या स्पर्धामध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत आपल्या खेळाचे दर्शन घडवले. महापौर संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धाचा पारितोषिक वितरण सोहळा ७ फेब्रुवारी रोजी पार पडला.

महापौर चषक क्रि केट स्पर्धेत श्रीरंग विद्यालय विजयी
महापौर चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीरंग विद्यालयाने विजेतेपद पटकावले. तर ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक तीनने उपविजेतेपद पटकावले. अंतिम फेरी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे झाली. या स्पर्धेत एकूण ६६ संघ सहभागी झाले होते. या वेळी उत्कृष्ट फलंदाज विकास दुबे, उत्कृष्ट गोलंदाज मावीया सिद्दीकी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकाश ठाकरे, उत्कृष्ट खेळाडू यश चाळके आणि संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओमकार जाधव याला सन्मानित करण्यात आले.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
Traffic changes in Collectorate area on the occasion of Dr Ambedkar Jayanti
पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग
first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

खोखो स्पर्धेत पुणे अजिंक्य
जिल्हा खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीत किशोर गटात पुणे जिल्हा संघाने नाशिक जिल्हा संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. तर किशोरी गटात पुणे जिल्हा संघाने ठाणे जिल्हा संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. किशोर आणि किशोरी गटातील उपविजेतेपद अनुक्रमे नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्हा या संघांनी पटकाविले. या स्पर्धा किशोर आणि किशोरी अशा दोन गटांत साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात आल्या. साकेत येथील सुसज्ज भव्य क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी उत्कृष्ट संरक्षक म्हणून पुण्याचा शुभम थोरात, उत्कृष्ट आक्रमक म्हणून पुण्याचा ऋत्विक भोर आणि अष्टपैलू दिलीप खांडवी तर किशोरी गटात उत्कृष्ट संरक्षक म्हणून पुण्याची साक्षी वाघ, उत्कृष्ट आक्रमक म्हणून पुण्याची प्राजक्ता चितळकर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ठाण्याची साक्षी तोरणे हिला गौरविण्यात आले.

हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत अपोलो जिमची बाजी
ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने ठाणे कला क्रीडा महोत्सव २०१६ अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील १२० स्पर्धकांतून छोटय़ा गटात अपोलो जिमच्या अजय पाटील, मध्यम गटात वाजिद खान, मोठय़ा गटात संजय आंबेरकर आणि वरिष्ठ गटात उमेर मिर्झा यांनी विजेतेपद पटकावले. या वेळी सांघिक विजेतेपद कळव्याच्या अपोलो जिमने जिंकले तर भिवंडीच्या युनिव्हर्सल फिजिक सेंटरने सांघिक उपविजेतेपद पटकावले. सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून संतोष पाटील याची निवड करण्यात आली. त्यानंतर किताब विजेत्यांना महापौरांच्या हस्ते ठाणे महापौर चषक, सन्मानपट्टा आणि रोख रुपये २५ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

मल्लखांब स्पर्धेत सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी प्रथम
मल्लखांब स्पर्धेत सांघिक गटात सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी यांनी प्रथम क्रमांक, सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांनी द्वितीय तर श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर (मुंबई) तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा महिला आणि पुरुष सांघिक व वैयक्तिक अशा दोन गटांत पार पडल्या. महापालिका आणि ठाणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या संयुक्त विद्यमाने घंटाळी मैदान येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जलतरण स्पर्धेला उदंड प्रतिसाद
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी रहेजा येथील ठाणे क्लब जलतरण तलाव येथे पार पडली. या स्पर्धेत विविध गटांतून एकूण १२ स्पर्धकांनी विजेतेपद व उपविजेतेपद पटकाविले. सहा वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम पारितोषिक आदित्य घाग (स्टारफिश असोसिएशन) तर मुलींमध्ये तनिष्का साळुंके (फादर एग्नेल स्पोर्ट्स क्लब) यांनी पटकाविले. आठ वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम पारितोषिक एन्ड्रय़ू डाइज (एन.एम.एस.ए. क्लब), तर मुलींमध्ये राघवी रामानुजन (ठाणे क्लब) यांनी पटकाविले. दहा वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम पारितोषिक अथर्व सरंगे (एन.एम.एस.ए. क्लब) तर मुलींमध्ये सवर आकुस्कर (स्टारफिश असोसिएशन) यांनी पटकाविले. बारा वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम पारितोषिक निधीश म्हापसेकर (डी.जी. क्लब) तर मुलींमध्ये आर्या कृपलानी (फादर एग्नेल स्पोर्ट्स क्लब) यांनी पटकाविले. चौदा वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम पारितोषिक ध्रुव्र पटेल (ठाणे क्लब) तर मुलींमध्ये अनन्या जोशी (ठाणे क्लब) यांनी पटकाविले. सतरा वर्षे वयोगटात मुलांमध्ये सिद्धांत खोपडे (ठाणे क्लब) याने तर मुलींमध्ये सागरिका जैन (एम.एस.एस.पी. क्लब) हिने पटकाविले.

सरस्वती क्रीडा संकुलाचे घवघवीत यश
ठाणे : नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अंजिक्यपद स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून पदकांची लयलूट केली. १२ वर्षांखालील मुलींमध्ये पूर्वा, सोहम आणि अनन्या, मुलांमध्ये कार्तिक, यश, आदित्य तर १० वर्षांखालील मुलांमध्ये मानस व आर्यन या खेळाडूंनी सवरेत्कृष्ट येण्याचा मान पटकाविला. यामध्ये आर्यन दवंडे याने दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवले आहे. मानस मानकवळे याने एक सुवर्ण दोन रौप्य पदक, माही बाभूळकर व वैदेही सुंभे यांनी एक कांस्य पदक, सोहम नाईकने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य, पूर्वा किरवे हिने तीन सुवर्ण, अनन्या बापट हिने तीन सुवर्ण एक रौप्य व एक कांस्य पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर ईरा हिने एक सुवर्ण दोन कांस्य, रुचा देवळे हिने एक सुवर्ण, गरिमा शर्मा हिने एक सुवर्ण, संस्कृती पवार हिने दोन कांस्य पदकेमिळवून आपली मोहोर उमटविली. तसेच श्रेयस मंडलिक याने एक सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य, कार्तिकी पडाळकर सहा सुवर्ण, तर यशने दोन सुवर्ण दोन कांस्य आणि दोन रौप्य पदके मिळवली आहेत.

बुद्धिबळ स्पर्धेत आकाश दळवी विजेता
महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक आकाश दळवी, द्वितीय क्रमांक साहिल नाखवा, तृतीय क्रमांक उत्कर्ष अगीवाल याने पटकाविला. १३ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक वेदांत पानसरे, द्वितीय क्रमांक अथर्व झील, तृतीय क्रमांक ईशा प्रीतम इनामदार हिने पटकाविला. अकरा वर्षांखालील गटात प्रथम पारितोषिक श्रेयस घाडी, द्वितीय क्रमांक प्रीतम प्रियांशू पंडा, तृतीय क्रमांक पार्थ दिक्षित याने पटकाविला. नऊ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक कदम ओम मनीष, द्वितीय क्रमांक सोटा हेम भाविक, तृतीय क्रमांक वेदांत नितीन वेखंडे, सात वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक क्षत्रिय नितीन वेखंडे, द्वितीय क्रमांक अरिष इनामदार, तृतीय क्रमांक मार्गिया गोटमरे यांनी पटकाविला. या स्पर्धेत १५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

सायकल स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
ठाणे जिल्हा हौशी सायकलिंग असोसिएशन, मुंबई जिल्हा हौशी असोसिएशन आणि एलसीपी सायकलिंग ग्रुप यांच्या सहकार्याने सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुष गटातून निकेत श्रीकांत पाटील याने प्रथम, दिलीप मरतड माने याने द्वितीय, जमादार शब्बीर जमादार याने तृतीय क्रमांक पटकाविला. खुल्या ७० कि.मी स्पर्धेत महिला गटातून प्रिताली शिंदे हिने प्रथम, पूजा कश्यब हिने द्वितीय, चैताली शिळदणकर हिने तृतीय क्रमांक पटाकाविला. २२ कि.मी. स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम क्रमांक कुणाल परदेशी, द्वितीय अमर पटेल, तृतीय अनुज फडके यांनी पटकाविला. महिला गटातून अमिषा शहा हिने प्रथम, द्वितीय सरिता वॉयलेट यांना मिळाला.

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिद्धांत कुडाळकर प्रथम
ठाणे : औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सी.एच.एम. महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत कुडाळकर याने ७४ किलो वजनी गटात ४९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान जिंकला. तसेच त्याने ‘स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’ हा किताबदेखील पटकविला.
या वेळी राज्यातील एकूण ९१ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सिद्धांतला सी.एच.एम. महाविद्यालयाचे कुलकर्णी तसेच विनायक राणे, सैदल सोंडे, नितीन कुडाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
संकलन :भाग्यश्री प्रधान