News Flash

गुन्हेवृत्त-विवाहितेचा छळ

महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासू तसेच पतीविरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हेवृत्त

येथील ढोकळी नाका भागातील स्वामी कृपा सोसायटीत राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासू तसेच पतीविरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघेही चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होते आणि दोघांनी दमदाटी करून बँक खात्यातून ४८ लाख रुपये काढण्यास भाग पाडले. तसेच मंगळसूत्र व सोन्याचा हारही जबरदस्तीने काढून घेतला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, कापुरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिगारेटने भरलेला टेम्पो पळविला

अंबरनाथ : येथील विम्को नाका भागातील आयटीसी कंपनीमधून सिगारेटचे बॉक्स घेऊन गोवंडी भागात निघालेल्या टेम्पोचालकास मारहाण करून चोरटय़ांनी टेम्पो चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. विठ्ठलवाडी येथील गावडे चाळीत टेम्पोचालक राहत असून तो बुधवारी दुपारी आयटीसी कंपनीतील सिगारेटचे बॉक्स गोवंडी भागात खाली करण्यासाठी घेऊन जात होता. बदलापूर-शीळ रोडवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याचा टेम्पो अडविला. दुचाकीला धडक दिल्याचे सांगत तिघांनी त्याला टेम्पोत बसविले आणि शीळ फाटय़ाच्या दिशेने दोन किलोमीटर अंतरापर्यंत टेम्पोने नेऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला टेम्पोतून खाली उतरवून त्यांनी टेम्पो चोरून नेला. सिगारेटचे बॉक्स आणि टेम्पो असा एकूण एक कोटी ६८ लाखाचा माल चोरटय़ांनी चोरून नेला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:28 am

Web Title: thane crime news 11
टॅग : News
Next Stories
1 आधारवाडी क्षेपणभूमीवरील धुराने रहिवाशांची घुसमट
2 मराठी शाळांचे माध्यमांतर
3 माध्यम मराठी, पण शिशूवर्गापासून इंग्रजी
Just Now!
X