24 January 2020

News Flash

ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

शनिवारी सकाळी तुर्भे- वाशी या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे- वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा शनिवारी सकाळी विस्कळीत झाली. तुर्भे- वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली.

शनिवारी सकाळी तुर्भे- वाशी या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल सेवा ठप्प झाली असून रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. यामुळे ठाण्यावरुन वाशीला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.  प्रवाशांना कुर्लामार्गे वाशी किंवा पनवेल येथे लोकल ट्रेनने जाता येईल.

 

First Published on April 20, 2019 9:34 am

Web Title: thane vashi trans harbour local service disrupted overhead wire issue
Next Stories
1 विजेविना कॅमेरे कुचकामी
2 तलासरीमधील ग्रीनपार्क रिसॉर्टवर पोलिसांची धाड, ८ तरुणींसह ११ पुरुष ताब्यात
3 आचारसंहितेत रस्त्यांच्या निविदा
Just Now!
X