घरातल्या बागेची निगा राखणे हे एक शास्त्र आहे. त्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते. सीकॅटर, कात्री, जुना स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पट्टी, सळई किंवा उलथणं. सीकॅटरचा उपयोग जाड फांद्या कापण्यासाठी होतो. लहान फांद्या कापण्यासाठी कात्रीचा उपयोग योग्य ठरतो. मात्र कात्रीला चांगली धार केलेली असावी. लोखंडी सळीचा उपयोग कुंडीतील बुजलेली भोकं मोकळी करण्यासाठी होतो. कुंडीतील झाडाला पाणी घातल्यानंतर पाण्याचा निचरा लगेच न होता जर ते कुंडीत साचून राहत असेल तर कुंडी थोडी तिरकी करून खालच्या बाजूच्या छिद्रातून सळई आत घालावी. त्यामुळे कुंडीची भोकं मोकळी होऊन पाण्याचा निचरा चांगला होतो. सळईच्या ऐवजी जुना स्क्रू ड्रायव्हरही आपण वापरू शकतो. लोखंडी पट्टीचा उपयोग झाड एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावताना येतो. याची माहिती आपण पुढील लेखांमध्ये घेऊ. या उपकरणांव्यतिरिक्त गृहवाटिकेसाठी कोणतेही उपकरण लागत नाही. याशिवाय घरीच उपलब्ध असलेल्या वस्तू गृहवाटिकेसाठी सहजरीत्या वापरता येतात. त्या वस्तू आणि त्यांचा वापर पुढीलप्रमाणे.
स्वयंपाकासाठी बहुतेक घरात नारळ आणला जातो. त्याची करवंटी गृहवाटिकेत उपयोगी आहे. एकतर करवंटीच एक नैसर्गिक कुंडी असल्याचे आपण मागे पाहिले. कारण त्यालाही खालच्या भागात छिद्र असते. या करवंटीचा वापर आपण कुंडीत माती भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी करू शकतो. दोरी, सुतळ अथवा दोऱ्याची बागकामात आवश्यकता असते. कारण अनेकदा वाढत्या रोपांना आधार हवा असतो. अशा वेळी खिडकीचे गज अथवा अन्य एखाद्या ठिकाणी झाडांची फांदी अलगदपणे बांधून ठेवावी लागते. एखादे पसरट भांडे अथवा टब असल्यास उत्तम. त्यात माती वाळविता येते. अनेकदा कुंडय़ांमधील झाडांना पाणी घालताना अथवा खुरपणी करताना सारखे वाकावे लागते. त्यातून पाठदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे छोटे स्टुल वापरावा. स्टुलावर बसून आरामात काम करता येते. इतके आणि एवढेच बागकामासाठी लागते. उगाच नको असलेली साधने बाळगू नयेत.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?