किशोर कोकणे
ठाणे : राज्यात दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील शिपाई आणि शिपाई चालक या पदासाठी २७३ जागांसाठी २९ हजार ९२५ अर्ज ठाणे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी सरासरी १०० हून अधिक जणांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात करोना प्रादुर्भाव तसेच आरक्षणाच्या मुद्दय़ावर २०१९ मध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. काही दिवसांपूर्वीच रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस शिपाई या पदासाठी १४७ आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी १२६ अशा जागांची भरती निघाली आहे. या जागांसाठी २९ हजार ९२५ अर्ज ठाणे पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. यामधील शिपाई पदासाठी ११ हजार ८७३ आणि चालक शिपाई या पदासाठी १७ हजार ९४९ उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. यापूर्वी मैदानी चाचणी घेतल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती. नव्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30000 applications 273 posts thane police recruitment ssh
First published on: 19-08-2021 at 01:28 IST