ठाणे शहरामधील वर्दळीचा भाग असणाऱ्या कॅडबरी कंपनी जवळच्या सिग्नलवर रात्री झालेल्या एका अपघातात ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय. समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेली व्यक्ती दुचाकीवरुन जात असताना तिने समोरच्या बसला धडक दिल्याने अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी सिग्नलजवळ शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामध्ये मरण पावणाऱ्या व्यक्तीचं नाव संजय यादव असं आहे. संजय हे आपल्या दुचाकीवरुन जात असताना कॅडबरी सिग्नलजवळ त्यांच्या दुचाकीने ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या टीएमटी बसला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात संजय यांचा मृत्यू झाला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35 year old man died in road accident near cadbury signal thane tlsp0122 scsg
First published on: 12-02-2022 at 07:43 IST