शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांतून वारंवार गळती
मीरा-भाईंदर शहरात ३० टक्के पाणीकपात असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे. त्यामुळे शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पण प्रशासनाचे याकडे बिलकूल लक्ष नाही. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांतून तब्बल ७० टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून मीरा-भाईंदरला दररोज १३६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येला दररोज १७० दशलक्ष लिटरहून अधिक पाण्याची गरज आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने शहरात ३० टक्के पाणीकपात आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. मात्र बाहेरून पाणी शहरापर्यंत येताना तसेच शहरातील नागरिकांपर्यंत ते वितरित होताना तब्बल १७ टक्के म्हणजेच सुमारे २३ दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे. जुन्या झालेल्या जलवाहिन्या, गळके व्हॉल्व यामुळे ही गळती होत असल्याचे समजते. दररोजचा होणारा हा पाण्याचा अपव्यय टाळला तर पाणीकपातीची दाहकता कमी होण्यास मदत होईल.
पाण्याचे लेखा परीक्षण
पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पालिकेने पाण्याचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली असून गळतीची ठिकाणे, अनधिकृत नळजोडण्या याचा शोध घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची शिफारस या संस्थेकडून केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरासरी देयकांची रक्कम कमी करा

पाण्याचे मीटर नादुरुस्त असलेल्या इमारतींना महापालिकेकडून ठरावीक रकमांची सरासरी देयके पाठवली जातात. मीटर दुरुस्त करण्याची कार्यशाळा शहरात नसल्याने रहिवासी सोसायटय़ांकडून ती दुरुस्त केली जात नाही. परिणामी सरासरी देयकांपोटी त्यांना अधिक रक्कम महापालिकेकडे भरावी लागतात. सध्या पाणीकपात सुरू झाल्यानंतर आठवडय़ात दोन दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी मिळत नसतानाही नागरिकांना भरुदड बसू नये यासाठी तुलनेत सरासरी देयकांची रक्कमही कमी झाली पाहिजे, तसेच पालिकेने मीटर दुरुस्ती कार्यशाळा सुरू करण्याचा ठराव काही वर्षांपूर्वी मंजूर केलेला असतानाही अद्याप ही कार्यशाळा सुरू झाली नाही. ही कार्यशाळा त्वरित सुरू करून नागरिकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 percent water west in mira road
First published on: 27-11-2015 at 04:23 IST