लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण जवळील मोहने येथे एका २१ वर्षाच्या तरुणीचा डेंग्युने मृत्यू झाला. या तरुणीला चार ते पाच दिवस ताप येत होता. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील रक्त घटकाचे प्रमाण कमी झाल्याने आणि तिला डेंग्यु झाल्याने तिचा मृत्यू झाला, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी सांगितले.

24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
125 people poisoned because of Mahaprasad One is dead six people are serious
चंद्रपूर : महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर

प्राची भास्कर तरे असे मयत तरुणीचे नाव आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची दखल घेतली. ही तरुणी राहत असलेल्या भागात घरोघरी नागरिकांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत. या भागात जंतुनाशक, धूर फवारणी केली जात आहे. ही तरुणी अभियंता होती. या तरुणीचा डेंग्युने मृत्यु झाल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी सांगितले असले तरी पालिकेने मात्र अद्याप डेंग्युने मृत्यु झाल्याचे जाहिर केलेले नाही. ही तरुणी उपचार घेत असलेल्या रुग्णालयातून तसेच तिच्या कुटुंबीयांकडून वैद्यकीय उपचारांची माहिती पालिकेने मागविली आहे. त्यात तिचा मृत्यु डेंग्यु किंवा अन्य काही कारणाने झाला आहे का, याची पालिका घेत आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणीच्या वैद्यकीय उपचाराची चिकित्सा केली जात आहे.

हेही वाचा… बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा; ठाणे, पालघर जिल्ह्यातील १२९ हेक्टर वन जमिनीचे संपादन

प्राचीला पाच दिवसांपासून ताप येत होता. डोके दुखत होते. पालकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना प्राचीची तब्येत खालावत गेली. तिच्या तात्काळ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्याचे आणि तिला डेंग्युची बाधा झाला असल्याचे निष्पन्न झाले होते.