कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात दहशत परसवून पसरवून इंटरनेट व्यवसाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका केबल व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख रौफ सैय्यद (रा. इंदिरानगर, बिर्ला महाविद्यालय रस्ता, कल्याण) असे आरोपीचे नाव असून प्रवीण गुजरे (रा. साईदीप सोसायटी, वायलेनगर) असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यवसायिकाचे नाव आहे. अनेक वर्ष इंटरनेट सेवा पुरविण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने आपला व्यवसाय बंद करावा. त्यांनी आपले ग्राहक आपल्या बंधूला द्यावेत म्हणून आरोपी परिसरात दहशत पसरवत आहे. तसेच शाहरुख हा तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, असे तक्रारीत म्हणले आहे.

हेही वाचा- अंबरनाथच्या सॅटीस प्रकल्पासाठी ८१ कोटी मंजूर; एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख सैय्यद याने इंदिरानगर भागात ग्राहकांना इंटरनेट सेवा पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय त्याने आपल्या भावाच्या नावाने सुरू केला आहे. या भागात पूर्वीपासून तक्रारदार प्रवीण गुजरे हेही इंटरनेट सेवा ग्राहकांना देत आहेत. शाहरुखला आपला व्यवसाय इंदिरानगर भागात वाढविण्यासाठी प्रवीण गुजरे यांचा अडथळा येत आहे. यासाठी शाहरुखने प्रवीण गुजरे यांना दहशतीचा अवलंब करुन त्यांना इंटरनेट सेवेचा व्यवसाय बंद करावा म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. व्यवसाय बंद करायचा नसेल तर प्रवीण यांनी त्यांचे ग्राहक आपल्याला द्यावेत म्हणून शाहरुख सतत प्रवीण यांना धमकावत आहे. शाहरुख नियमित प्रवीण यांच्या वायलेनगर भागातील कार्यालयाबाहेर येऊन त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.

हेही वाचा- नागरी समस्याग्रस्त डोंबिवलीतील नागरिकांचे फडके रस्त्यावर आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण आपले ऐकत नाही म्हणून शाहरुखने रात्रीच्या वेळेत प्रवीण यांच्या इंदिरानगर भागातील इंटरनेट सेवेच्या जाळ्या कापून टाकल्या आहेत. यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. तसेच प्रवीण यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. इंटरनेत सेवा पुरवठ्यात महत्वाची असलेले एक यंत्र शाहरुखने चोरुन नेले आहे, अशी तक्रार प्रवीण यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.