कल्याण– पतीचे बाहेरील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून कल्याण मध्ये एका स्थापत्य अभियंता असलेल्या महिलेने गुरुवारी विष पिऊन आत्महत्या केली. प्रज्ञा सचिन मोरे (४४) असे स्थापत्य अभियंता असलेल्या मयत महिलेचे नाव आहे. मयत प्रज्ञा यांची मुलगी रिध्दी हिच्या तक्रारीवरुन कल्याण मधील बाजारपेठ पोलिसांनी प्रज्ञाचा पती सचिन अनंत मोरे (४९, रा. दीपाली पार्क, वालिवली, बदलापूर) यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे.

पोलिस ठाण्यातील तक्रारीत तक्रारदाराने म्हटले आहे, सचिन मोरे आणि एका महिलेचे अनैतिक संबंध आहेत, याची माहिती प्रज्ञा मोरे यांना डिसेंबर २०१९ मध्ये मिळाली होती. त्या महिलेशी संबंध ठेऊ नका, असे पत्नी प्रज्ञा सतत आपल्या पतीला सांगत होती. त्या महिलेशी संबंध ठेवणार नाही असे बोलून सचिन पुन्हा त्या महिलेच्या संपर्कात होते. त्या महिलेला आपण सोडू शकत नाही. तुला काय करायचे ते कर, तू जीव दे नाहीतर काही कर असे पत्नी प्रज्ञाला बोलून ते पत्नी बरोबर भांडण उकरुन काढत होते.

हेही वाचा >>> भिवंडीत रासायनिक गोदामांना आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनैतिक संबंध असलेली महिलाही प्रज्ञा यांना संपर्क करुन चिथावणीखोर भाषा करुन प्रज्ञा यांना मानसिक त्रास देत होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आई प्रज्ञा हिने उंदीर मारण्याचे औषध पिऊन राहत्या घरात आत्महत्या केली, असे तक्रारदार रिध्दी हिने म्हटले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ या प्रकरणाचा तपास करत आहेत.