ठाणे: जिल्ह्यातील नाट्यगृहांमध्ये दिवाळी सुट्टीनिमित्त बालनाट्यांचा महोत्सव भरल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन, डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह आणि कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात १६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत विविध बालनाट्य मुलांच्या भेटीसाठी आले आहेत. ही बालनाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आगाऊ नोंदणी केली असून यामुळे या नाट्यांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

सहामाही परिक्षा संपताच, मुलांना दिवाळीची सुट्टी लागते. ही सुट्टी १५ ते २० दिवसाच्या कालावधीची असते. दिवाळी सण संपल्यावर या सुट्टीत करायचे काय असा प्रश्न मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही पडत असतो. यासाठी शहराशहरांमध्ये विशेष शिबीर भरविण्यात येतात. तर, शहरातील नाट्यगृहांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग लावले जातात. लहान वयात मुलांमध्ये नाटकाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विविध संस्थांकडून बालनाट्यांची निर्मिती केली जाते. सामाजिक, ऐतिहासिक जनजागृतीपर, तसेच काही मनोरंजनात्मक विषयांवर आधारित ही बालनाट्य असतात.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

हेही वाचा… दिवाळी काळात प्रदूषण वाढले

दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या सुट्टीच्या कालावधीत म्हणजेच उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्यांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग होत असतात. यंदाही ठाणे जिल्ह्यात दिवाळी सुट्टीनिमित्त बालनाट्यांचा महोत्सव भरल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन, डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह आणि कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे १६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत बालनाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. आठवड्यातून दोन ते तीन दिवस ही बालनाट्य होतात. काही बालनाट्यनिर्मिती संस्थांकडून एका तिकीटावर तीन तर, काही संस्थांकडून दोन बालनाट्याचे प्रयोग ठेवण्यात आले आहेत. हे बालनाट्य पाहण्यासाठी प्रेक्षक आगाऊ नोंदणी करत असल्याची माहिती नाट्यगृह व्यवस्थापकांकडून देण्यात आली.
कधी, कुठे, कोणते नाटक
राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे

१६ नोव्हेंबर – धम्माल भूत बंगला, मोबाईल गेम्स आणि चॅम्पियन्स

१७ नोव्हेंबर – मिनीच्या शाळेत छोटा भीम, घाबरट पळपुटा शूरसिंह, नालायक सिंहाची फायटींग, छोटा भीम सोबत महाराजा सिंह
१७ नोव्हेंबर- फुलातील फूल, भांडणपूरचे इटकू पिटकू, गंमत नाट्याचे गुपित

१८ नोव्हेंबर – अलबत्या गलबत्या,
२० नोव्हेंबर- फुग्यातला राक्षस, टेडी आणि डोरेमॅान, जोकर आणि जादुगार

२१ नोव्हेंबर- कॅामेडी चेटकीण, मला आई-बाबा हवेत, ढोलकपूरचा लाडुचोर
२३ नोव्हेंबर- हरवलेल्या बेटांचं गुपित, आजी मी शिवबा पाहीला

डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
१६ नोव्हेंबर – जादुची थैली, जगावेगळे मित्र, छोट्यांचे पोलीस स्टेशन

१८ नोव्हेंबर- फुलातील फूल, भांडणपूरचे इटकू पिटकू, गंमत नाट्याचे गुपित
सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली

१८ नोव्हेंबर – कॅामेडी चेटकीण, मला आई-बाबा हवेत, ढोलकपूरचा लाडुचोर
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण<br>१७ नोव्हेंबर- कॅामेडी चेटकीण, मला आई-बाबा हवेत, ढोलकपूरचा लाडुचोर
कोट

प्रत्येक बालनाट्यात गंमती-जंमतीच्या माध्यमातून एक सकारात्मक संदेश दिला जातो. त्यामुळे बालनाट्य पाहण्यासाठी लहान प्रेक्षकवर्ग हा उत्सुक असतो. पाच ते आठ वयोगटातील मुले जास्त प्रमाणात बालनाट्य पाहण्यासाठी येत आहेत. – राजू तुलालवार, लेखक-दिग्दर्शक