अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा उपनगरीय रेल्वेगाडीच्या धडकेत बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. रामेश्वर देवरे (२२) असे त्याचे नाव असून त्याच्या मृत्यूने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.मुंब्रा शहरात एम एम व्हॅली परिसरातील मौलाना अब्दुल कलम आझाद क्रिडाप्रेक्षागृह येथे २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत अग्निवीर भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेसाठी धुळ्याहून रामेश्वर देवरे ह तरुण आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याणमधील भातसा नदीच्या पाण्यावर रासायनिक सफेद रंगाचा तवंग

रामेश्वर देवरे हा तरुण मुंब्रा स्थानकात बसला असताना त्याची तब्बेत अचानक बिघडली आणि त्याला उलटी होऊ लागली. उलटी करण्यसाठी रामेश्वरने रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली. उलटी करत असताना त्याचे उपनगरीय रेल्वेगाडीने त्यास जोरदार धडक दिली. या धडकेत रामेश्वर याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man who had come for the recruitment of fire fighters died in a train collision amy
First published on: 22-09-2022 at 21:43 IST