एसटी तिकिटाबरोबरच्या अधिभारामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम

अधिकच्या एक रुपया वसुलीने प्रवासी-वाहकांमध्ये वादाचे प्रसंग

एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासी भाडय़ासह अपघात साहाय्यता निधीच्या स्वरूपात तिकिटामागे एक रुपया अधिकचा मोजावा लागत आहे. या अधिकच्या तिकीट वितरणामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे तिकीट शासनाकडून मान्य केलेल्या अपघात साहाय्यता निधीसाठी असून त्यात प्रवाशांचा फायदा असला तरी वेगळ्या तिकिटामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. शिवाय त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. त्यामुळे अपघात साहाय्यता निधीची रक्कम प्रवासी तिकिटाच्या रकमेतच समाविष्ट करून प्रवाशांना एकच तिकीट वितरीत करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी आणि कामगार संघटनांकडून केली जाऊ लागली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपघाताच्या प्रसंगी तात्काळ मदत पुरवता यावी या उद्देशाने ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात साहाय्यता निधी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून प्रवाशांचा अपघात झाल्यास मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांस आणि जखमी प्रवाशास देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

तांत्रिक दिरंगाईचा फटका..     

* अतिरिक्त एक रुपया मूळ तिकिटात समाविष्ट करण्यासाठी तांत्रिक प्रणाली विकसित केली जात आहे. मात्र अशी प्रणाली विकसित होईपर्यंत वेगळ्या तिकिटाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

* महामंडळाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या परिपत्रकामधे या तांत्रिक दोषाचा असा उल्लेख करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* याला आता सुमारे १८ दिवसांचा कालावधी लोटला तरी हा दोष मात्र अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही.

*  त्यामुळे ही प्रणाली विकसित होईपर्यंत प्रवाशांना वेगळे तिकीट प्रवासादरम्यान सांभाळून ठेवावे लागणार आहे.