कल्याण – महावितरणने कल्याण पूर्व विभाग आणि टिटवाळा भागात दोन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत क कोटी पाच लाखाची वीज चोरी उघड झाली असून यामध्ये ३३२ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे. यात कल्याण पूर्व विभागात ६६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून याप्रकरणी २४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर टिटवाळा उपविभागातही ३८ लाख ७९ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी एकाच दिवसात ८४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी शोध मोहिम सुरू आहे. कल्याण पूर्व विभागातील अडिवली, ढोकली, मानपाडा, दावडी, हेदुटणे, घेसर, कोळेगाव, सोनारपाडा, काटेमानिवली, कटाई भागात ६ आणि १० ऑक्टोबरला व्यापक शोध मोहिम राबवण्यात आली. यात २४८ ग्राहकांकडे वातानुकूलन यंत्रणेसाठी थेट वीजवापर, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलमधून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या ग्राहकांनी ६६ लाख रुपये किंमतीची ३ लाख ३ हजार ८०० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याची नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते कांतीलाल पाटील, नितीन चंदनमोरे, मुंजा आरगडे, उपकार्यकारी अभियंता पद्माकर हटकर, अभियंते, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या चमुने ही कारवाई केली.

houses, Mulund,
१४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण
Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

हेही वाचा >>>डोंबिवली, कल्याणमध्ये नवरात्रोत्सव मंडपांच्या ठिकाणी कचरा कायम

टिटवाळ्यात कारवाई

टिटवाळा उपविभागातील मांडा, गोवेली, कोन आणि खडवली शाखा कार्यालयांतर्गत १० ऑक्टोबरला घेतलेल्या व्यापक शोध मोहिमेत ८४ ठिकाणी वीजचोरी आढळली. या ८४ जणांनी ३८ लाख ७९ हजार रुपये किंमतीची एक लाख ८१ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते अभिषेक कुमार, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे, सचिन पवार आणि जनमित्रांच्या गटाने ही कामगिरी केली.