‘एम्स’ रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक असलेली, उच्च दर्जाची रेडिएशन थेरपी सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. रेडिएशन थेरपीसाठी ‘इलेक्टा इन्फिनिटी विथ अॅजिलिटी’ ही परदेशी बनावटीची अत्याधुनिक मशीन रुग्णालयात बसवण्यात आली आहे. सर्व स्तरातील कर्करुग्णांबरोबर सामान्य, गरीब, दारिद्रय़रेषेखालील कर्करोग झालेल्या रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती ‘एम्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी दिली. आर्थिक उत्पन्नाचा स्तर कमी असलेल्या, दारिद्रय़रेषेखालील (केसरी, पिवळी शिधापत्रिका) कुटुंबातील रुग्णाला कर्करोग असेल. त्या रुग्णावर सरकारच्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य’ योजनेच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. शिरोडकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2015 रोजी प्रकाशित
डोंबिवली येथील ‘एम्स’मध्ये रेडिएशन थेरपीची सुविधा
‘एम्स’ रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक असलेली, उच्च दर्जाची रेडिएशन थेरपी सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
First published on: 14-05-2015 at 12:37 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aims dombivli radiation therapy