नववर्षाच्या पहिल्याच  दिवशी हत्येच्या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ माजली असतानाच दुसऱ्याच दिवशी शहरात सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका तरूणीवर तीन मित्रांनीच बलात्कार केला असून या तीनही आरोपींना अटक करण्यत आल्याची माहिती शिवाजीनगर  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे. 

अंबरनाथ अतिरिक्त  औद्योगिक  परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात हा प्रकार  झाला  असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती भोगे यांनी दिली आहे.  रविवारी दुपारी अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक  वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात ही तरुणी तीन मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे तीनही आरोपी २५ ते ३० वयोगटातील आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती भोगे यांनी दिली आहे. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे.