अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसी येथे एका केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरीवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू  आहेत.

प्रेशिया केमिकल्स असे या कंपनीचे नाव असून आग लागताच कंपनीतील सर्व कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार १३ कामगार कंपनीत काम करत होते. आगीमुळे कंपनीतून स्फोटांचा आवाजही येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath morivali midc fire breaks out in chemical factory fire tender on spot
First published on: 05-11-2018 at 15:25 IST