महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कल्याण आणि भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. सभा संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतताना राज यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्या सोबत होते. मिसळीचा पहिलाच घास खाल्ल्यानंतर अमित ठाकरेंना मिसळ तिखट लागली. त्यावेळी राज यांनी काय केलं पाहा…

दरम्यान, राज ठाकरे मामलेदारला आल्याचे समजताच हॉटेलबाहेर राज समर्थकांची मोठी गर्दी झाली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणारे मामलेदार हे ठाण्यातील सर्वाधिक लोकप्रिय मिसळ मिळण्याचे ठिकाण असून येथील मिसळीचा झणझणीतपणा हा अनेकांना आकर्षित करतो. राज यांच्या प्रमाणे अनेक दिग्गजांना येथील मिसळ आवडते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोटोगॅलरी >> …आणि राज ठाकरेंचा संपूर्ण ताफा ‘ही’ प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी ठाण्यात थांबला!

मिसळ खाऊन झाल्यानंतर राज यांचा ताफा पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला.