डोंबिवली – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडके रस्ता भागात कार्यक्रमासाठी येणार म्हणून शनिवारी संध्याकाळ ते रविवारी पहाटेपर्यंत फेरीवाला मुक्त केलेला फडके रस्ता भाजपा नेत्यांची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा रस्ता, पदपथ अडवून कायमस्वरुपी ठेले बांधण्यात आले आहेत.

डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून फडके रस्ता ओळखला जातो. ४० फूट रुंदीच्या या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले चार ते पाच फुटांची जागा अडवून बसतात. या रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीसाठी १० ते १५ फूट जागा उपलब्ध असते. पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ फेरीवाल्यांनी सामान, टोपल्या ठेऊन अडविलेले असतात. या रस्त्यावरून कसरत करून पादचाऱ्यांना चालावे लागते. रविवारी सकाळपासून पालिकेच्या फ प्रभाग अधिकाऱ्यांनी फेरीवाला मुक्त केलेला फडके रस्ता सोमवारी सकाळपासून पुन्हा फेरीवाल्यांनी सामान ठेवण्यासाठी काँक्रीट ठोकळ्यांचे मंच उभारून व्यापून टाकला आहे.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

हेही वाचा – मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला धनगर समाजाचा पाठिंबा

गणेश मंदिराजवळील आप्पा दातार चौक ते बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली, नेहरू रस्ता भागातील फेरीवाल्यांना कायमचे हटवून पालिकेने हा वर्दळीचा भाग फेरीवाला मुक्त करण्याची अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी आहे. परंतु, पालिका अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा – कल्याण लोकसभेसाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

वरिष्ठ पालिका अधिकारीही या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करतात. त्याचा गैरफायदा फेरीवाले घेत आहेत. भाजपाचे नेते संकल्प यात्रेसाठी डोंबिवलीत येणार म्हणून शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना फडके रस्ता भागात बसू नये, अशा सूचना केल्या होत्या. रविवारी सकाळी ते दुपारपर्यंत भाजपा नेते फडके रस्ता भागात असेपर्यंत फेरीवाले या भागात फिरकले नाहीत. परंतु, भाजपाचा फडके रस्त्यावरील कार्यक्रम संपताच फेरीवाल्यांनी या रस्त्यावरील आपल्या नेहमीच्या जागा अडविल्या. फेरीवाल्यांच्या या कृतीमुळे फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.