भिवंडी येथील शांतीनगर भागात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचे ओठ कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुक्तार अन्सारी आणि शाहिद या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दोघांचा शोध घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथील शांतीनगर भागात पीडित तरुणी राहते. याच परिसरात मुक्तार आणि शाहिद राहतात. ९ एप्रिलला तरुणी परिसरातून पायी जात असताना मुक्तार आणि शाहीद या दोघांनी तिला अडविले. शाहिदने तरुणीला पकडले. तर मुक्तारने त्याच्याकडे असलेल्या चाकूने पीडित तरुणीची ओठ कापले. या घटनेनंतर मुक्तार आणि शाहिद या दोघांनी पळ काढला. पीडित तरुणीला नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी सोमवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on a young woman out of one sided love abn
First published on: 14-04-2021 at 00:33 IST