कल्याण मोहने मधील एक विकासक आणि मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष आपल्या मित्राच्या मुलीला येथील बिर्ला महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी प्रवेश घेण्यासाठी मोटारीने सोमवारी दुपारी चालले होते. यावेळी बंदरपाडा भागात चार जणांनी विकासकाची मोटार अडविली. त्यांना बेदम मारहाण, शिवीगाळ करत त्याना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण करणारा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक स्थानिक पदाधिकाऱ्याचा लहान भाऊ आहे, असे स्थानिकांनी सांगितले. याप्रकरणी विकासकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरुध्द तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित अनंत कोट (२९, रा. विकासक, जनाई धाम, शिवाजी चौक, मोहने, आंबिवली) हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. विकासक अमित कोट यांनी अश्विन जोगदंड (३५), संदीप डोलारे (३४) आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.पोलिसांनी सांगितले, विकासक अमित कोट हे आपले मित्र गोरख येवले यांच्या सोबत बिर्ला महाविद्यालय येथे गोरख यांच्या मुलीला अकरावी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी चालले होते. मोहने बंदर भागातून जात असताना अचानक आरोपी चार जण विकासक अमित यांच्या मोटारीला आडवे आले. त्यांनी मोटार थांबवून अमित यांच्याशी वाद घातला.

हेही वाचा : ठाणे : सत्यनारायण पूजेला बसण्यास रोखल्याने केला चाकूने वार

अमित मोटारीतून बाहेर आल्यावर चारही जणांनी त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अश्विन जोगदंड याने अमित यांच्या छातीवर चाकूने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. तू मला जेथे भेटशील तेथे तु मी तुला ठार मारीन अशी धमकी जोगदंड यांनी अमित यांना दिली. मारहाणी नंतर आरोपी पळून गेले. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोहने येथील नागरिकांनी सांगितले, की अमित कोट हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत. आरोपी अश्विन जोगदंड हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांचा लहान भाऊ आहे. तो मोहने येथील रिक्षा संघटनेचा अध्यक्ष आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on divisional president of mns vidyarthi sena in kalyan tmb 01
First published on: 13-09-2022 at 16:43 IST