कल्याण- येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात बुधवारी सकाळी एका मद्यपान करुन आलेल्या व्यक्तीने रुग्णालयातील डॉक्टरशी किरकोळ कारणावरुन वाद घालून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी डॉक्टरने पोलीस ठाण्यात कळविताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन त्याला पोलीस ठाण्यात नेले.

हेही वाचा >>> बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या कडोंमपा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डॉ. सतीश गेडाम हे पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी एक ६५ वर्षाचे गृहस्थ कल्याण पूर्वेतून श्वान चावला म्हणून उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना तेथे संतप्त होऊन मद्यपान करुन विजय गोसावी (३९, भगवान नगर, काटेमानिवली, कल्याण) आले. त्यांनी उपचार सुरू असलेल्या आपल्या वडिलांना तुम्ही कशासाठी घराबाहेर पडलात. वैगरे बोलून त्यांच्याशी वाद घातला.

हेही वाचा >>> नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला थायलंडमध्ये डांबले आणि …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपचार सुरू असताना गोसावी हे वडिलांशी वाद घालत असल्याने डॉ. गेडाम यांनी येथे उपचारी रुग्णाला शिवीगाळ करू नका आणि भांडण करत बसू नका असे सांगून त्यांना दालना बाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग गोसावी यांना आला. त्यांनी डॉ. गेडाम यांना तुम्ही मला बोलणारे कोण असे प्रश्न करुन त्यांच्याशी वाद उकरून काढून त्यांना मारहाण करण्यासाठी धावला. या प्रकाराने रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले. डॉ. गेडाम यांनी तात्काळ महात्मा पोलिसांना कळविले. पोलिसांनी रुग्णालयात येऊन गोसावी यांना पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार डॉ. गेडाम यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे.