ठाणे : येत्या दोन दिवसांवर दहीहंडी उत्सव येऊ ठेपला असताना, राजकीय पक्षांची आयोजनासाठी लगबग सुरू झाली आहे. ठाण्यात जांभळीनाका येथे ठाकरे गट तर, टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून दहीहंडीचे आयोजन केले जाते. शिंदे गटाने टेंभीनाका येथील दहीहंडीचे बॅनर जांभळीनाका येथे उभारले आहेत. त्यामुळे दहीहंडी निमित्त ठाकरे आणि शिंदे गटात वादात बॅनरवॉर सुरू असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील दहीहंडीची संपूर्ण देशभरात वेगळी ओळख आहे.

हेही वाचा >>> मोठागाव-दुर्गाडी वळण रस्ता ‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी समितीच्या मंजुरी अभावी रखडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दरवर्षी रस्ते अडवून दहीहंडीचे आयोजन केले जात असते. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वीपासूनच शिवसेनेच्या दोन हंड्यांचे आयोजन अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरावर होत आहे. यामध्ये जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून दहीहंडीचे आयोजन केले जात होते. याचे मुख्य आयोजक खासदार राजन विचारे असतात. तर टेंभीनाका येथील चौकात ठाण्यातील सर्वांत जुनी हंडी ओळखली जाणारी ‘दिघे साहेबांची हंडी’चे आयोजन केले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंडीचे आयोजन होत असते. शिंदे गटाच्या या हंडीचे बॅनर जांभळीनाका येथील चौकतही झळकू लागले आहेत. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील या बॅनरवॉरची चर्चा शहरात सुरू आहे.