ठाणे : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अपर पोलीस अधीक्षकपदी भागवत सोनवणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांनी संजय गोविलकर यांच्याकडून या पदाची सूत्रे हाती घेतली. राज्याच्या पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर भागवत सोनवणे कार्यरत होते. त्यांच्याकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उप अधीक्षक पदावर धडाडीने काम केले आहे. तसेच साहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नागपूर शहर, मुंबई शहर, नाशिक शहर, राज्यातील ग्रामीण भागातही उत्कृष्ट सेवा बजावली आहे.