ठाणे : भिवंडी येथे १४ वर्षीय मुलाने त्याच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी येथील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलगी दोन महिन्यांची गरोदर झाली असून पोलिसांनी मुलाच्या पालकांना नोटीस बजावली आहे.

भिवंडी येथे १४ वर्षीय मुलगा राहतो. त्याच भागात पिडीत १४ वर्षीय मुलगी देखील राहते. घरामध्ये कोणीही नसताना त्याने मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ती मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. डाॅक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. दरम्यान, मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही एकाच भागात राहत असून ते नववीत शिकत आहेत. याप्रकरणी मुलाच्या वडिलांना नोटीस बजाविण्यात आली आहे. मुलाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (उ), ६५ (१) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.