ठाणे : कशीश पार्क येथे फलक बसविण्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याप्रकरणी निष्पक्षपणे तपास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे केली. तसेच त्यांना निवेदनही देण्यात आले. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यावेळी केळकर यांनी शहरात राजरोसपणे फिरत असलेल्या हद्दपार गुंडांचाही मुद्दा उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काहीजणांचा शुक्रवारी रात्री फलक बसविण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर प्रशांत जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह १० जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे, विकास रेपाळे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिंदे गटात सहभागी असलेल्या एका माजी नगरसेविकेने प्रशांत जाधव यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी याप्रकरणात निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी भाजपचे पदाधिकारी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp delegation meets thane police commissioner jaijeet singh demands action against shinde group workers for beating party worker zws
First published on: 02-01-2023 at 17:23 IST