भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर या भाजप आमदारांच्या मतदारसंघाची घट्ट बांधणी करण्याचे नियोजन भाजपने सुरू केले आहे. ही बांधणी केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने भाजपचे केंद्रीय मंत्री दर महिन्याला कल्याण लोकसभा क्षेत्रात फेऱ्या मारत आहेत, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बांधणीला विशेष महत्व आहे.

Nagpur, BJP MLA sister, deprived of voting,
नागपूर : भाजप आमदाराच्या भगिनीचेच नाव मतदार यादीतून वगळले
Khadakwasla, Baramati, Ajit Pawar,
‘बारामती’साठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी, महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवा; अजित पवारांची सूचना
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक

हक्काच्या मतदारसंघातील इमारत ते झोपडपट्टीमधील मतदार प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखता आला पाहिजे. निवडणुकीच्या काळात एका इशाऱ्यानिशी हा मतदार मतदानासाठी बाहेर पडला पाहिजे. अशा दृष्टीने या मतदारांच्या संपर्कात जाऊन, त्यांचे प्रश्न समजवून घेऊन त्यादृष्टीने तळपातळीवर काम करण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत, असे वरिष्ठ नेता म्हणाला.

आणखी वाचा- जेथे शिवसेनेचा खासदार तेथे शिवसेनेचाच उमेदवार; खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा

मागील ४० वर्षापासून जनसंघापासून डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला आहे. या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक गठ्ठा मतदार ही भाजप उमेदवाराची मोठी जमेची बाजू आहे. विधानसभेला भाजप आणि लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराला वेळोवेळी येथील मतदाराने भरघोस मतदान केले आहे. या मतदारसंघावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची एकहाती पकड आहे. मतदारसंघात वेळेला मंत्री चव्हाण यांच्या विरोधात कितीही वातावरण निर्माण करण्यात विरोधक, परिवारातील काही मंडळी यशस्वी झाली तरी मतदानाच्या दिवशी ३५ ते ४० हजाराचे मताधिक्य घेऊन ते बाजी मारतात. दिल्लीतील थेट वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कातील मंत्री चव्हाण यांची डोंबिवलीतील पकड आणखी मजबूत करुन भाजपच्या या हक्काच्या मतदारसंघाची बांधणी अधिक मजबूत असावी म्हणून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन वेळा या शहराचा दौरा केला आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आ. गणपत गायकवाड यांची हुकमत आहे. राज्य सत्तेप्रमाणे त्यांनी भूमिका बदलल्या. आता भाजपचा कल्याण पूर्वेतील गड राखून ठेवण्यात आ. गायकवाड यांचा महत्वाचा वाटा आहे. भौगोलिकदृष्ट्या शहरी, ग्रामीण अशा भूक्षेत्रात विभागलेल्या या मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावून या मतदारसंघावरील आपला वरचष्मा कायम राहील याची काळजी आ. गायकवाड घेतात. उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. आलटून पालटून या शहरात आमदार निवडून देण्याची पध्दत आहे. एक गठ्ठा सिंधी समाज भाजपच्या पाठीशी राहील असे नियोजन करण्याच्या रसूचना केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आणखी वाचा-विरोधकांकडून संभ्रम पसरवण्याचे काम, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची टीका

विखुरलेली बांधणी

अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा मतदारसंघ शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. या परिसरातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे अभेद्य संघटन करुन या मतदारसंघांवरील भाजपची पकड मजबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेने आपलाही अभेद्य एकजुटीचा एक मतदारसंघ असावा म्हणून अंबरनाथ मतदारसंघाच्या विकासावर भर दिला आहे. कल्याण लोकसभेवर दावा करण्याची वेळ आली तर क्षणात तीही तयारी असावी, या दूरदृष्टीतून भाजपच्या या भागात सुप्त हालचाली आहेत. शिवसेनेने कितीही दावा केला तरी, प्रसंगी मनसे, राष्ट्रवादीशी ‘हितगुज’ एका प्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठी भाजप ही आखणी करत असल्याचे हे लपून न राहिलेले सत्य भाजप कार्यकर्ते खासगीत मान्य करतात. याविषयी उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही.