प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी यांचे शहापूरजवळ अपघाती निधन झाले आहे. मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या गीता या मागील काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये होत्या. भारतात परतल्यानंतर नाशिकला जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्या ३७ वर्षांच्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास शहापूरमधील लाहे फाटा येथील रस्त्यावर झालेला हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता आणि त्यांचे पती अ‍ॅड. विजय माळी यांच्या गाडीच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये भरधाव वेगाने येणारी गाडी थेट रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या इंधन वाहून नेणाऱ्या टँकरला धडकताना दिसत आहे. तुम्हीच पाहा हे सीसीटीव्ही फुटेज

अपघात झाला त्या दिवशी (१४ नोव्हेंबर रोजी) सकाळी अमेरिकेहून आल्यानंतर मुंबई विमानतळावर उतरल्यावर गीता यांनी फेसबुकवर विमानतळावरील काही फोटो पोस्ट केले होते.

नक्की वाचा >> ‘ही’ ठरली गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट

गीता यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली होती. सुगम संगीतामध्ये त्यांनी स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली होती. याशिवाय अध्यात्म आणि ध्यान धारणेचीही त्यांना आवड होती. देश-विदेशात त्यांच्या गायनाचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. २०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या वीर सावरकर विश्व साहित्य संमेलनामध्ये त्यांनी गायन केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv marathi singer geeta mali killed car accident caught on camera scsg
First published on: 18-11-2019 at 17:24 IST