ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री  टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी भर पावसातही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांची भेट घेतली. त्यावेळी शिंदे हे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी दुपारपासून त्यांचे समर्थक भरपावसात टेंभिनाका येथे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहा व्हिडीओ –

शिंदे यांचे आगमन होताच समर्थकांनी जल्लोष केला. ढोल आणि ताशांच्या तालावर समर्थकांनी ठेका धरला. शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते. जोरात पाऊस सुरू असतानाही समर्थकांचा जल्लोष सुरू होता. शिंदे यांनी सोमवारी रात्री  टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर आनंद आश्रम येथे गेले आणि तेथून बाहेर पडून त्यांनी समर्थकांची भेट घेतली.  त्यावेळी शिंदे हे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde became emotional after meeting the supporters zws
First published on: 04-07-2022 at 23:19 IST