समर्थकांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री झाले भावुक

शिंदे यांनी सोमवारी रात्री  टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री  टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी भर पावसातही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांची भेट घेतली. त्यावेळी शिंदे हे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी दुपारपासून त्यांचे समर्थक भरपावसात टेंभिनाका येथे उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ –

शिंदे यांचे आगमन होताच समर्थकांनी जल्लोष केला. ढोल आणि ताशांच्या तालावर समर्थकांनी ठेका धरला. शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते. जोरात पाऊस सुरू असतानाही समर्थकांचा जल्लोष सुरू होता. शिंदे यांनी सोमवारी रात्री  टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर आनंद आश्रम येथे गेले आणि तेथून बाहेर पडून त्यांनी समर्थकांची भेट घेतली.  त्यावेळी शिंदे हे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde became emotional after meeting the supporters zws

Next Story
अंबरनाथ रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी करणारे अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी