ठाणे : वसंत विहार भागातील शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अक्षय ठुबे हे वसंत विहार येथील धर्मवीर नगर परिसरात राहतात. ते शिंदे गटात असून तेथील उपशाखा प्रमुख आहेत. मंगळवार पासून ते घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बुधवारी रात्री अक्षय यांचा मृतदेह कोकणीपाडा परिसरातील जंगलात आढळला.

garbage, Ghatanji,
यवतमाळच्या घाटंजीत कचऱ्याचे ढीग, मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Traffic jam, Govind Karsan Chowk,
कल्याणमधील गोविंद करसन चौकातील बस थांब्यामुळे वाहन कोंडी
karad a fight between two drunken
कराड: मद्यपी दोघा परप्रांतीय तरुणांच्या भांडणात एकाचा दांडक्याच्या मारहाणीत निर्घृण खून
Kolhapur Municipal Officer, Kolhapur Municipal Officer Suspended, Unauthorized Tree Felling, Unauthorized Tree Felling in Padmaraje Park, Kolhapur news, Kolhapur municipalitya, marathi news,
कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे निलंबित; पद्माराजे उद्यान्यातील वृक्षतोड प्रकरण भोवले
Kalyan, jeans making factories, Chinchpada, Dwarli area, kdmc, resident, pollution issue
कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त, प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त
Jail
नुपूर शर्मासह तिघांना धमक्या, सनातन संघटनेच्या अध्यक्षाच्या हत्येचा कट; मुस्लीम धर्मगुरूला सुरतमधून अटक!
pregnant woman, water tank,
धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीला पाण्याच्या टाकीत….
pimpri chinchwad crime news, pimpri chinchwad vitthal ludekar marathi news
पिंपरी: कोयत्याचा धाक, गुंडगिरी करणारा तडीपार; इतर दोघांवर मोक्काअंतर्गत कारवाई; चिखली पोलिसांची कामगिरी

हेही वाचा : डोंबिवली : टिळक सिनेमागृहाचे मालक मोरारजी विरा यांचे निधन

त्यांनतर पोलिसांनी तपास करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता अक्षय यांनी त्यांना साडेतीन लाख रुपये दिले होते. पैशांचा तगादा अक्षय करू लागल्याने त्यांनी अक्षय यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.