Thane news : ठाणे : पावसाळ्यापुर्वी शहरातील नाल्याची साफसफाई करण्यात येते. यंदाही ठाणे महापालिकेने पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे केली. नालेसफाई कामादरम्यान, ठेकेदारांकडून नाल्यातून काढण्यात येणारा गाळ आणि कचरा नाल्याशेजारी ठेवण्यात येतो आणि काही दिवसानंतर तो उचण्यात येतो. परंतु कापुरबावडी भागात नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा गेल्या दोन महिन्यांपासून उचलण्यात आलेला नसून यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा दावा करत काँग्रेस नेत्यांनी या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापुर्वी शहरातील नाले सफाईची कामे करते. पावसाळ्यात नाल्यातील कचऱ्यामुळे पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नालेसफाईची कामे करण्यात येतात. यंदाही पालिकेकडून नालेसफाईची कामे करण्यात आली. मात्र, या कामांवर पालिकेच्या कारभारावर दरवर्षी टिका होते. यंदाही पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ लोटल्यानंतरही नालेसफाईच्या कामावरून टिका होत असून ठाण्यातील काँग्रेस नेत्यांनी नालेसफाईच्या कामावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत आरोप केले आहेत.
काँग्रेसचा आरोप
दोन महिन्यांपूर्वी मी आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो होतो. गाळ काढून आठवडा उलटून गेला असतानाही ठेकेदाराने तो उचलला नव्हता. त्यानंतर दोन महिन्यांनी येथे आलो आहे. मात्र गाळाच्या ढिगाची परिस्थिती जैसे थे होती. दुर्गंधी युक्त गाळाचा डोंगर येथे दिसून आला. या गाळामुळे 6 जणांना डेंग्यू झाला असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या ठिकाणी रहिवासी स्वातंत्र्य दिनी ध्वजा रोहण करतात, दहीहंडी, गणपती उत्सव साजरे करतात. हे सर्व सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही. येत्या ४८ तासांत गाळ उचलणे बंधनकारक असतानाही दोन महिने उलटले तरी तो ढिगाऱ्यासारखा तसाच पडून आहे. ठेकेदाराला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असून, याला प्रशासनाचा थेट आशीर्वाद आहे, असा गंभीर काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे.
काँग्रेसने केली पालिकेकडे हि मागणी परिसरातील नागरिक स्वातंत्र्य दिनी ध्वजा रोहण करतात. दहीहंडी, गणपती उत्सव साजरे करतात. हे सर्व सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही. त्यामुळे ठेकेदाराने ४८ तासात गाळ उचलला नाही, या नियमाचा भंग केल्या प्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड ठोठावून त्याला काळ्या यादीत टाकायला हवे. घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी पिंगळे यांनी केली आहे.