येथील खडकपाडय़ातून पौर्णिमा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संदीप हॉटेलच्या चौकात रविवारी ट्रकने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरून प्रवास करणारे सुरेश जाधव (५०) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा भाचा मयूर रोकडे (२५) हा जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक विकास जाधव याच्यावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन घरफोडय़ा
डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकाजवळच्या समतानगर भागात गुड्डु मन्नालाल प्रजापती (२८) यांच्या घरात चोरटय़ांनी स्वयंपाकघराची खिडकी उघडून प्रवेश केला आणि सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला. दुसऱ्या घटनेत तावरी पाडा परिसरातील परशुराम चाळीत राहणाऱ्या विकास बनसोडे (३२) यांच्या घरी चोरटय़ाने चोरी केली. याप्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारसे समारंभात चोरी
ठाणे : मानपाडा येथील गार्डन इस्टेट परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश दिवेकर (३७) यांच्या मुलीच्या बारशाचा कार्यक्रम रविवारी लुईसवाडी भागातील शहनाई मंगल कार्यालयात होता. तेव्हा अज्ञात इसमाने दिवेकर यांच्या आईची काळ्या रंगाची पर्स चोरली. त्यातून रोख, मोबाइल फोन, रोख रक्कम, चांदीचे दागिने असा ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2015 रोजी प्रकाशित
गुन्हेवृत्त :ट्रक-मोटारसायकल अपघातातएक ठार
येथील खडकपाडय़ातून पौर्णिमा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संदीप हॉटेलच्या चौकात रविवारी ट्रकने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.
First published on: 17-02-2015 at 12:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news from all over from thane