ठाणे येथील आझादनगर भागात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एककडून अटक करण्यात आली आहे. उमेशकुमार रामसरण प्रजापती (२४) आणि सैयद हुसैन शेर खान (४६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पावणेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

ठाणे येथील आझादनगर भागात काही जण गांजा विक्री करत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकच्या पोलिसांनी आझादनगर येथून उमेशकुमार आणि सैयद या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही आझादनगर भागात राहत असून या दोघांकडून पोलिसांनी पावणेचार किलो गांजा जप्त केला आहे.