वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

ठाण्यात कशेळी पुलावर रघुनाथ साळुंखे या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली

ठाण्यात कशेळी पुलावर रघुनाथ साळुंखे या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने साळुंखे यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्याहून भिवंडीकडे जाताना कशेळी पुलावर, दत्त मंदिरासमोर शनिवारी रात्री रघुनाथ साळुंखे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी गतिरोधक आल्याने आपल्या वाहनाचा वेग कमी केला. यावेळी मागून भरधाव आलेल्या वाहनाने साळुंखेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Death of one due to vehicle collision

ताज्या बातम्या