वनखात्याच्या जमिनीवरील झाडे कापण्यास हरित लवादाकडून नामंजुरी; सूर्या योजनेचा मुहूर्त लांबणीवर
वसई-विरार शहराची तहान भागविण्यासाठी सूर्या धरणातून १०० दशलक्ष लिटर पाणी देण्याची योजना लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. या योजनेच्या मार्गात असलेल्या वनखात्याच्या जागेवरील झाडांची कत्तल करण्यास हरित लवादाने परवानगी दिलेली नाही. सोमवारी झालेली या प्रकरणाची सुनावणी २० मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे काम ठप्प झाले असून वसईकरांना या पाण्याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
वसई-विरार शहराला सूर्या धरणातून १०० दशलक्ष लिटरचे पाणीे देण्यात येणार आहे. सूर्या पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक ३ असे या योजनेचे नाव आहे. २९६ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत सुरुवातीला वनविभागाच्या परवानगीेचा अडथळा आला होता. वनविभागाचीे परवानगीे मिळाल्यानंतर आता झाडे कापण्यासाठी हरित लवादाने हरकत घेतलीे आहे. सोमवारी लवादाच्या पुणे न्यायालयात झालेली सुनावणी पुढे ढकलण्यात आलीे आहे. ही सुनावणीे आता २० मे रोजी होणार आहे. त्यामुळे पुन्हा या योजनेला अडसर निर्माण झाला आहे.
३७७ झाडांचा अडथळा
२९६ कोटी रुपयांची ही योजना वसई विरार महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. २७ जानेवारी २०१४ रोजी या योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सुरुवात करण्यात आलीे होतीे. २८ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु या योजनेच्या १९ किलोमीटर मार्गातीेल जलवाहिन्या या वनविभागाच्या जागेतून जाणार आहेत. वनविभागाने पहिला अडसर या योजनेला निर्माण केला होता.
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पाठपुरावा करून कशीेबशीे परवानगीे मिळविल्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये वनविभागाने आपल्या जागेतून जलवाहिन्या टाकण्यास परवानगी दिली. त्यासाठी पालिकेने महाड येथे पर्यायी जागाही दिलीे होती. वनविभागाच्या जागेत एक हजार झाडे होती. ही झाडे कापावी लागणार होती. परंतु या १९ किलोमीटर परिक्षेत्रातील १० किलोमीटर क्षेत्र हे वन्यजीव अभयारण्याचे आहे. अभयारण्याच्या दहा किलोमीटर परिघाचे क्षेत्र हे संरक्षित मानले जाते. या संरक्षित क्षेत्रात ३७७ झाडे येतात. ही ३७७ झाडे तोडण्यास हरित लवादाने हरकत घेतली.
जोपर्यंत लवाद परवानगीे देत नाही तोपर्यंत ही सर्व १००० झाडे कापता येणार नाहीत. त्यामुळे योजनेचे काम रखडले आहे. यापूर्वी एक सुनावणीे लवादापुढे झाली. लवादाने पर्यायी मार्गाबद्दल विचारणा केली होती. परंतु आता पर्यायी मार्ग देणे शक्य नाही. जोपर्यंत लवादाकडून हिरवा सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत या योजनेचे काम पुढे सरकणार नाही.
पालिकेने झाडे तोडायचे साडेसहा लाख रुपये यापूर्वीच वनविभागाक डे भरले आहेत. लवादाकडून परवनगी मिळाल्यानंतर पुढील तीन महिन्यांत योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे मे महिन्याचा मुहूर्तही टळला आहे.